कुडाळ ( प्रतिनिधी ) : नेरूर गोवेरी येथील उपशिक्षक अमोल तुकाराम गोसावी यांना मांडकुली शाळा नंबर १ येथे तात्पुरते व्यवस्थापनाची जबाबदारी दिली गेल्याने नेरूर गोवेरी येथील विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आल्यावर पालक व विद्यार्थी यांनी ४ दिवस शाळा बंद आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचे आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणात रूपांतर करण्यात आले.हे शिवसेना पदाधिकारी अरविंद करलकर तसेच शिवसेना जिल्हासंघटक रुपेश पावसकर,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर,तालुकाप्रमुख योगेश तुळसकर,आशू अग्रवाल यांना समजताच त्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सचिन वालावलकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क संबंधित अधिकारी यांना पूर्वी दिलेले आदेश स्थगित करून त्यांना पूर्वीच्या आस्थापनेवर हजर करण्याच्या सूचना दिल्या,त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना संबंधित ग्रामस्थ यांना तसे पत्र देण्याचे आदेश दिले,त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांनी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात पत्र दिले, व उपशिक्षक अमोल तुकाराम गोसावी यांना कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले.यावेळी उपस्थितशाळा नेरुर गोवेरी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावडे, साक्षी वारंग उपाध्यक्ष, मंगेश गावडे, रामा जाधव, सतिश जाधव, संतोष वारंग, सतिश गावडे, पूर्वी जाधव, महेंद्र गावडे, सुरेखा रामुळ, प्रदिप जाधव, प्रिया गावडे, सुनिल गावडे, प्रतिक्षा राऊळ, किशोर मुळीक, मानसी जाधव, केदार आजगावकर, मिनाक्षी गावडे, संदिप जाधव, राशी गावडे, मोहन जाधव, विजया गावडे, साक्षी भावडे आरती गावडे रश्मी जाधव समिक्षा जाधव सुषमा जाधव यशश्री जाधव दिव्या जाधव सत्यवती जाधव धनश्री लिंगवे सानिका सोनवडेकर प्रविण गावडे उमेश राऊळ सुरेश राऊळ, सचिन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांनी शिवसेना पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.












