महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांचे शाम तावडे सह ग्रामस्थांना मागण्या मान्य करून उपोषण स्थगित करण्याचे विनंती पत्र
कुडाळ (प्रतिनिधी) : २६ जानेवारी २०२४ रोजी नेरूर वाघाचौडी येथील शाम गावडे सह ग्रामस्थ आज कुडाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आले.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी औद्योगिक विकास महमंडळाचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांना संपर्क करून उपोषण कर्त्याना पत्र उपोषण स्थगित करण्याची विनंती केली व तसे पत्र दिले.शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी यापूर्वी शाम गावडे सह ग्रामस्थ यांना राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत तसेच शिवसेनेचे नेते किरण सामंत यांची भेट घडवून आणली होती. व ग्रामस्थ यांच्या मागण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. होती. परंतु प्रशासनाकडून विलंब होत असल्याने ते उपोषणास बसले होते.रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने गावडे यांच्या मागण्या मान्य केल्याचे पत्र त्यांना दिले.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख अरविद करलकर ,अजित मार्गी, माजी सरपंच शाम गावडे,ग्राम.सदस्य प्रभाकर गावडे, जयराम परब, काका गावडे, किशोर,अनील, सुरजित, विष्णू, देसाई काका,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच रुपेश पावसकर यांनी उपोषण कर्त्यांचे उपोषण स्थगित केल्याबद्दल स्वागत करण्यात आले.













