शिवगडावर स्वच्छता अभियान राबवताना तिरंगा- भगव्या ध्वजाला “गार्ड ऑफ ऑनर”ची सलामी !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने अन् अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून, भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन, फोंडाघाट कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी कॅडेट्सनी अनोख्या रीतीने साजरा करून पंचक्रोशी कौतुकाची थाप मिळविली.
प्रथम अभयारण्याच्या गर्द वनराईत समुद्रसपाटीपासून उंच स्थानावरील शिवरायांच्या शिवगड टेहाळणी गडदुर्गाची स्वच्छता कॅडेट्सनी केली.त्यानंतर किल्ल्यावर तिरंगा ध्वज आणि भगवा ध्वज फडकवून “गार्ड ऑफ ऑनर” ची सलामी दिली. यावेळी शिवप्रतिमेचे पूजन करून डॉ. बालाजी सुरवसे यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन लेफ्ट. डॉ. ताडेराव यांनी केले. रेवती , मेस्त्री, आकांक्षा जाधव, आयुष सावंत, रिया मेस्त्री,शुभम लाड, सारिका येंडे, साक्षी हरमलकर, विशाखा शिंदे, अखिलेश तळवडेकर, चैतन्य पावसकर इत्यादी कॅडेट्स या मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रमाला फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, प्राचार्य अन प्राध्यापक वर्गाने शुभेच्छा दिल्या.













