प्रजासत्ताक दिन संचलनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी “विशेष पाहुणे” म्हणून आमंत्रित केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे चव्हाण लाभार्थी
आचरा (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथिल डॉ. आंबेडकर इंरनॅशनल सेंटर येथे पारंपरिक कारगिरांची केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भेट घेत सविस्तर चर्चा, आणि मार्गदर्शन केले. या कारगिरातील चिंदर येथील रहिवासी परेश प्रभाकर चव्हाण व पत्नी पूर्वा चव्हाण यांचे नारायण राणे यांनी विशेष सन्मान आणि अभिनंदन केले.
यावेळी बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने सुरुवात झालेल्या ‘पीएम विश्वकर्मा योजने मुळे पारंपरिक व्यावसाय वृद्धीगत होण्यास मदत होईल.
तसेच प्रजासत्ताक दिन संचलनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी “विशेष पाहुणे” म्हणून आमंत्रित केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यान सहित परेश व पूर्वा हे जनपथ येथे ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.













