शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेही होईल होणार. सिंधुदुर्ग किल्ल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे सावंतवाडीत सकाळी ११.३० वाजता गांधी चौक या ठिकाणी भेट देणार आहेत दुपारी १२.३० वाजता कुडाळ येथील जिजामाता चौकात दुपारी १.३० वाजता मालवण विश्रामगृह त्यानंतर दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणार दुपारी ३.३० वाजता मालवण आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेणार संध्याकाळी ५.३० वाजता कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांचा घरी मुक्काम व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार 5 फेब्रुवारी सकाळी १०.३० वाजता आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सकाळी ११.३० वाजता तरळे दुपारी १२ वाजता राजापूर जकात नाका दुपारी १२.३० वाजता धूत पापेश्वर मंदिरची पाहणी दुपारी १ वाजता बारसू येथे देवाचे गोठणे येथे भेट त्यानंतर १.४५ वाजता पावस मार्गे रत्नागिरी दुपारी २.३० वाजता रत्नागिरी ३.३० वाजता देवरुख सायंकाळी ५ वाजता चिपळूण व सायंकाळी ७.१० ला खेड येथून मुंबईकडे प्रयाण शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या दौऱ्यात मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!