सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्यांक समाज यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ठाकरेंच्या पाठीशी उभा असेल : मज्जिद बटवाले

शिवसेना उबाठा पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विजय भवन येथे घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेची जिल्ह्यातील अल्पसंख्यांकाने घेतली भेट या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट वस्तू म्हणून दिली. या दरम्यान ठाकरे यांनी आपुलकीने चौकशी केली याचे त्यांना कौतुक वाटले त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे येणाऱ्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने ठामपणे उभा राहणार लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा घेतला जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले यांनी दिली.

शिवसेना उबाठा पक्षाचे अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या मस्जिद बटवाले पत्रकारांशी बोलताना म्हणाले ज्यावेळी गद्दारी झाली तेव्हा वर्षा बंगल्यापासून ते मातोश्री पर्यंत साहेबांचा प्रवास झाला होता तो अजूनही आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. ज्या लोकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विश्वासघात केला त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना आम्ही भुईसपाट करू आणि त्यामध्ये आमच्या अल्पसंख्याकांचा मुस्लिम समाजाचा मोठा वाटा असेल उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बघण्याचे जे स्वप्न आहे ते आम्ही 2024 चा निवडणुकांमध्ये पूर्ण करू आमचा संपूर्ण जिल्हा अल्पसंख्यांक मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आम्ही अल्पसंख्यांक समाजाची योग्य ती बांधणी केली आहे. लवकरच जिल्ह्यात मेळावा घेतला जाईल संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज ठाकरेंच्या मागे आहे आगामी निवडणुकीमध्ये आमचा संपूर्ण मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी आहे. हे दिसेल आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बघण्याचे जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार असल्याचे मज्जिद बटवाले यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शहा, आचरा तालुकाप्रमुख झैफ काझी, निसार शेख, मालवण तालुकाप्रमुख साजिद बंगी, फय्याज खान, वेंगुर्ला तालुकाप्रमुख रफिक बेज, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, इमाम नावलेकर, गवस बोबडे, अब्दुल लावलेकर, याकुब नवलेकर, अफजल बटवाले, रईस बटवाले, मुनाफर बटवाले, महमंद साठविलकर, बटवाले मॅडम, साजिद बांगी आदीसह अल्पसंख्यांक बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!