तेव्हाचे पालकमंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात

हत्तीप्रश्नावर उपरकर यांचा सवाल

कणकवली (प्रतिनिधी) : हत्तींचा विषय गेले पंचवीस तीस वर्ष सुटलेला नाही. या कालावधीत जेवढे पालकमंत्री झाले ते सर्वजण आता तुमच्याच मांडीला मांडी लावून बसतात. हत्तीच्या या प्रश्नांवर कोट्यावधी रुपये खर्च होऊनही प्रश्न सुटत नसेल तर विरोधकांनी का बोलू नये असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार श्री उपरकर म्हणतात पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार हत्तीच्या प्रश्नात राजकारण नको हा संवेदनशील विषय आहे. तसेच यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काय केले असा त्यांचा सवाल आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षाहून अधिक काळाचा विचार केला तर विद्यमान खासदार नारायण राणे, त्यानंतर उदय सामंत, दीपक केसरकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण हे सर्वजण जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आज हे सर्वजण सत्तेत आहेत विद्यमान पालकमंत्री नितेश राणेंच्या मांडीला मांडी लावून बसतात. मग या पालकमंत्र्यांनी काय केले हा सवाल त्यांनी या पालकमंत्र्यांना करायला पाहिजे
हत्तींच्या या विषयात खंदक खणले, मसाल्याचे दोरखंड वापरले, ट्रँग्यूलाइज केले, हत्ती ग्राम घोषित करण्याचा विषय झाला, इलेक्ट्रिक कंपाउंड तयार करण्यात आले असे एक ना एक उपाय करून कोट्यवधी रुपयांचा चुरडा करण्यात आला. सुमारे 300 कोटींच्या आसपास रक्कम खर्च करूनही हत्तींचा प्रश्न जैसे ते आहे. मग सिंधुदुर्गमध्ये ही अशी परिस्थिती असेल आणि दररोज हत्तींकडून सर्वसामान्य शेतकरी नागरिकांचे नुकसान होत असेल तर विरोधकांनी का बोलू नये. गेला 30 वर्षातून अधिक काळ या सत्ताधाऱ्यांना हा विषय सोडवता आलेला नाही. विद्यमान पालकमंत्र्यांसह यापूर्वीच्या एकाही पालकमंत्र्याला हा विषय मार्गी लावता आलेला नसल्याने या विषयाचे राजकारण नको म्हटले जात आहे. मात्र या सत्ताधाऱ्यांनी आता तरी हा विषय मार्गी लावून शेतकरी बागायतदारांना दिलासा द्यावा असेही श्री उपरकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!