कणकवली (प्रतिनिधी) : घरगुती संबंधांचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी व्हॉटस्अॅप, फेसबुक, मेसेंजरद्वारे प्रेमसंबंध निर्माण करत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रितेश रामचंद्र चव्हाण याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले,
जून २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये फिर्यादीने ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंधन निर्माण केले. त्यातून होकार मिळताच सातत्याने व्हॉटसअप, फेसबुक, मेसेंजर याद्वारे संपर्क साधून तीच्याशी जवळकीक निर्माण केली. त्यानंतर घरात एकटी असताना लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही शाळा चूकवायला लावून तीला विविध ठिकाणी फिरण्यासाठी येण्यास भाग पाडले. भेटवस्तुही दिल्या. दरम्यान फिरायला येण्यास तीने नकार दिला असता घरच्यांना फोटो व मेसेज दाखविण्याची धमकी दिली. अखेरीस पडितेने आपल्या आईवडिलांना कल्पना दिली असता आरोपीला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने वडिलांना धमकी दिली. असे असताना आरोपी पुन्हा पिडीतेशी संपर्कसाठी फोन करू लागला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपीवर भा.न्या.सं. कलम ६४, ६४ (२ आय व एम), तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १० व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने २५ हजारांचा जामिन मंजूर करताना पिडीतेशी संपर्क साधू नये, तपासात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत.












