विशेष संपादकीय

सिंधुदुर्ग : आताच्या घडीला भाजपाकडून देशात कुठलीही निवडणूक असली की मोदी की गॅरंटी ही खास टॅगलाईन वापरली जाते. मोदी की गॅरंटी ह्या जादुई शब्दांचा करिश्मा अलीकडे झालेल्या राजस्थान सह अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये देशवासियांनी अनुभवला.अगदी इंडिया आघाडी ने रान उठवून सुद्धा फक्त मोदी की गॅरंटी चा करिश्मा असा काही झाला की इंडिया आघाडी चा मुखभंग झाला. जसे भाजपा देशभरात मोदी की गॅरंटी म्हणते तसेच सिंधुदुर्गात स्थानिक पातळीवर कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात पाहिले तर भाजपा आमदार नितेश की गॅरंटी हा मंत्र जोरदार चालत असल्याचे दिसून येते. नितेश की गॅरंटी चा हा मंत्र सहजासहज तयार झालेला नाहीय तर त्यामागे आमदार नितेश राणेंनी खडतर मेहनत घेत अभ्यासू वृत्तीने केलेला आपल्या मतदारसंघाचा विकास कारणीभूत आहे. राज्यात सत्तांतर होऊन पावणे दोन वर्षे झालीत. या पावणे दोन वर्षात आमदार नितेश राणे यांनी शे दोनशे कोटी नव्हे तर तब्बल 2 हजार 436 कोटी 89 लाख रुपयांचा आश्चर्य वाटावा असा विकासनिधी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात विकासकामांसाठी आणला आहे. आमदार म्हणून केवळ 5 कोटी वार्षिक निधी असतो. मात्र आमदार नितेश राणेंनी आणलेल्या विकासनिधी ची आकडेवारी बघितली तर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्या पेक्षाही दसपट हून अधिक विकासनिधी विविध योजनांच्या माध्यमातून आणलेला दिसून येतो. एवढा मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्यासाठी महत्वाची गरज असते ती आपल्या मतदारसंघात नेमकं कोणते विकासकाम होणे आवश्यक आहे अथवा कोणते धोरणात्मक विकासकाम होऊ शकते याची खडानखडा माहिती असणे आणि तो विकासनिधी आणण्यासाठी लागणारा प्रशासकीय अभ्यास, विविध विकास योजनांची इत्यंभूत माहिती. राजकारणी माणसाला अहोरात्र मेहनत ही घ्यावीच लागते तरच आजच्या सुपरफास्ट जमान्यात राजकीय पटलावर निभाव लागू शकतो. आमदार नितेश राणे यांच्याकडे हे सर्व गुण ठासून भरले आहेत. अहोरात्र मेहनत करण्याचा डीएनए त्यांच्या रक्तातच आहे. आमदार नितेश राणेंकडे गेल्यावर सार्वजनिक विकासाचे काम होणारच, मग त्यासाठी कुठलीही प्रशासकीय अडचण असली तरी त्यावर नितेश राणे मार्ग काढणारच हा भाजपा पदाधिकारी असो अथवा सामान्य कार्यकर्ता असो प्रत्येकाला विश्वास असतोच. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदगाव ग्रामपंचायत च्या निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी खुलेआम जाहीर केले की राज्यात सत्ता आमची आहे.विकास हवा असेल तर आमच्या पक्षासोबत या. आमच्या विचारधारेचा सरपंच आणि ग्रामपंचायत निवडून द्या विकासकामासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही. आमदार नितेश राणेंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी घेतला. नितेश राणे मतदारांना धमकावत आहेत, असा प्रचारही केला गेला. पण विरोधी पक्षाच्या त्या प्रचाराचा परिणाम काही झाला नाही. उलट कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील नांदगावसह 80 टक्के ग्रामपंचायत आणि थेट लोकनियुक्त सरपंच हे भाजपाचेच निवडून आले हे विशेष आहे. नितेश राणे यांनी आपल्या वचनाला जागत गावोगावी विकासनिधी ची कमतरता मागील पावणे दोन वर्षांत कधीच पडू दिली नाही.एवढेच नाही तर विरोधी आमदार असताना सुद्धा विकासनिधी साठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून राजकीय कोंडी केली जात असतानाही आपल्या उद्योजकांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर सीएसआर मधून विकासनिधी आणलेला जनतेने बघितला आहे.जो निधी आजवर कधीच आला नव्हता. अगदी मागील महिन्यात 14 जानेवारी 2024 रोजीच्या कणकवली येथील भाजपा सेना आणि महायुती कार्यकर्ता मेळाव्यातही नितेश राणे यांनी आमच्या पक्षात या नाहीतर विकासनिधी साठी कितीही बोंबलला तरी निधी मिळणार नाही असे पुन्हा एकदा जगजाहीर सांगितले. मुळात एक बाब इथे समजून घेणे गरजेचे आहे की कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या इतिहासात आजवर न भूतो असा 2 हजार 436 कोटी 89 लाख रुपयांचा विकासनिधी प्रत्यक्ष आणण्याची किमया आमदार नितेश राणे यांनी साधली आहे.कणकवली मतदारसंघातील विकासनिधी चा बॅकलॉग सत्ताधारी आमदार म्हणून मागील पावणे दोन वर्षात भरून काढण्याचे डोंगराएव्हढे काम नितेश राणे यांनी करून दाखवले आहे. आणि हेच नेमके कारण आहे की कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश की गॅरंटी हा करिष्मा चालतो आहे. त्यामुळेच इथली सर्वसामान्य जनता नितेश राणे यांच्या पाठीशी आहे. अगदी विरोधी आमदार असताना जनतेच्या विकासकामांसाठी नितेश राणेंचा डीपीडिसी मीटिंगमधील आक्रमकपणा सुद्धा जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. त्या आक्रमकतेमागे स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाच नसायचा…फक्त सर्वसामान्य जनतेची विकासकामे व्हावीत हाच उद्देश असायचा. नितेश राणे यांनी सत्ताधारी आमदार म्हणून विविध 20 योजनांखाली पुढीलप्रमाणे विकासनिधी अवघ्या पावणे दोन वर्षात आणला आहे. बजेट सार्वजनिक बांधकाम सन 2023/24 – 250 काेटी, बजेट सार्वजनिक बांधकाम सन 2022/23 – 202 काेटी,नाबार्ड 20 काेटी, नागरी सहाय्य याेजना (कणकवली नगर पंचायत ) 12.50 काेटी, जिल्हा वार्षिक पर्यटन (कणकवली नगर पंचायत धबधबा) 10 काेटी, नागरी सहाय्य याेजना (देवगड-जामसंडे नगरपंचायत) 2 . 75 काेटी,नगरोत्थान ( देवगड-जामसंडे नगरपंचायत ) 4 .34 कोटी,नागरी सहाय्य योजना (वाभवे-वैभववाडी नगरपंचायत) 22. 50 कोटी,नगरोत्थान (वाभवे-वैभववाडी नगरपंचायत) 1.30 कोटी,जिल्हा वार्षिक योजना 62 कोटी, डोंगरी विकास 8 . 50 कोटी, ADB तळेरे विजयदुर्ग रस्ता 250 कोटी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गगनबावडा तळेरे रस्ता 250 कोटी,देवगड निपाणी फोंडा नांदगाव दाजीपूर रस्ता (हॅम) प्रस्तावित 861 कोटी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 42 कोटी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 94 कोटी, 2515 योजना 15 कोटी,अल्पसंख्याक योजना 2 कोटी,समाज कल्याण योजना 2 कोटी,पाटबंधारे एकूण 325 कोटी असा एकूण 2 हजार 436 कोटी 89 लाख रुपयांचा विकासनिधी अवघ्या पावणे दोन वर्षांत राज्यात सत्ताधारी पक्षाचा आमदार असलेल्या नितेश राणे यांनी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात स्वबळावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणला आहे. त्यामुळेच कणकवली मतदारसंघातील जनताच म्हणताना दिसून येते की इथे चालते ती फक्त आणि फक्त नितेश की गॅरंटी !











