सविता आश्रम पणदूर येथे दाखल केलेल्या अनोळखी वृद्ध इसमाचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : पियाळी येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक 70 वर्षीय अनोळखी वृद्ध इसम मिळून आल्याने, पियाळी पोलीस पाटील श्री सुनील पवार यांनी सविता आश्रम पणदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना कळविल्याने श्री संदीप परब यांनी सविता आश्रमचे कर्मचारी पाठवून सदर इसमास सविता आश्रम मध्ये नेऊन दाखल केले परंतु सदर इसमाने आपले नाव गाव सांगितलेले नाही . त्यानंतर दिनांक 02.02.2024 रोजी सदर वृद्ध इसमाची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ओरोस येथे सविता आश्रम चे कर्मचारी यांनी उपचारासाठी दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून सदरचा वृद्ध इसम मयत झाल्याचे घोषित केले. म्हणून सविता आश्रम चे कर्मचारी आशिष नंदकिशोर कांबळी यांनी मृत्यू बाबत कणकवली पोलिसांना कळविले. 8 त्यानंतर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री शरद देठे यांनी जिल्हा रुग्णालय उरूस या ठिकाणी जाऊन प्रेताचा पंचनामा केला .त्यानंतर डॉक्टरांनी प्रेताचे पोस्टमार्टम करून मयत याला आलेले मरण हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आलेले असल्याचे कळविले आहे. मयत इसमाचे प्रेत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील शीतगृहात ठेवण्यात आलेले आहे. सदर आकस्मित मृत्यूचा पुढील तपास कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री बापू खरात हे करीत आहेत . महेश माझी ओळख पटल्यास कृपया पोलीस उपनिषक श्री खरात त्यांचा मोबाईल नंबर 9823080798 वर संपर्क साधावा

error: Content is protected !!