सलग तिसऱ्या वर्षीही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले राज्य गुणवत्ता यादीत स्थान
यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ऑक्टोबर २०२३ रोजी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन परिक्षा महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर पार पडल्या होत्या. या परिक्षांचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.
वैभववाडीत केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालय येथे एलिमेंटरी परिक्षेस एकुण २८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २६५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एलिमेंटरी परिक्षेचा केंद्राचा निकाल ९३.९७ टक्के लागला तर इंटरमिजिएट परिक्षेस एकुण ३२१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन इंटरमिजिएट परिक्षेचा केंद्राचा निकाल ८०.३७% लागला. दरवर्षी प्रमाणे यंदाही वैष्णवी हुदले या विद्यार्थीनीने राज्य गुणवत्ता यादीत यावर्षीही स्थान पटकावले. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे २१ विद्यार्थी एलिमेंटरी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एलिमेंटरी परिक्षेचा प्रशालेचा निकाल १००% टक्के लागला तर इंटरमिजिएट परिक्षेस प्रशालेचे २६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन इंटरमिजिएट परिक्षेचा प्रशालेचा निकाल ९६.१५% टक्के लागला आहे. प्राजस शिंदे, मधुरा चोरगे, वैष्णवी हुदले, शिवानी फुटक, सलोनी केळकर, राहुल राठोड, यश पाटील, मानसी चव्हाण या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परिक्षेत ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख बी.एस.नादकर यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना कला शिक्षक एम.एस.चोरगे यांनी मार्गदर्शन केले. मार्च मध्ये होणाऱ्या एस.एस.सी परिक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या श्रेणी नुसार अनुक्रमे 7,5,3 अतिरिक्त गुणांचा लाभ देण्यात येणार आहे.











