ब्युरो न्युज (दिल्ली) : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले होते. अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दिलं आहे.
निवडणूक आयोगाने जसा न्याय एकनाथ शिंदे यांना दिला, तसाच निर्णय अजित पवार यांना दिल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता शरद पवार गटाला वेगळं चिन्ह आणि पक्षाचं नावाने आगामी निवडणूक लढवावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवार आता कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांच लक्ष लागंलय.