फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी ) पुणे यांच्या माध्यमातून मराठा, कुणबी, मराठा- कुणबी आणि कुणबी- मराठा या लक्षीत गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता, प्रशिक्षण आणि रोजगार वाढीसाठी करुल,घोणसरी, लोरे नंबर १ च्या ग्रामपंचायत मध्ये, फोंडाघाट येथील इंटेल एज्युकेशनचे प्रशांत वांजुळे यांनी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ महिला- पुरुष- युवाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सारथीची उद्दिष्टे आणि रोजगार वाढीसाठी उपक्रम सांगताना, प्रशिक्षणार्थींना मिळणारी शिष्यवृत्ती, फेलोशिप, अनुदान याबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यातील वाटा सांगताना त्याचे फायदे, मिळणाऱ्या सुविधा व साहित्य याचा त्यामध्ये समावेश होता. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा उपरोक्त समाजातील बांधवांनी घ्यावा, असे आवाहन वांजुळे आणि उपस्थित मान्यवरांनी केले. त्याला ग्रामीण भागातील समाज बांधवांना बांधवांनी योग्य प्रतिसाद दिला












