शिवणकला व वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स परीक्षेत कनेडी हायस्कूलचे विद्यार्थी उत्तीर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या वतीने कौशल्य विकास अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंडिया या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने माहे जुलै पासून शिवणकला आणि वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात आलेला होता. या कोर्स साठी ज्युनिअर कॉलेजमधील ३४ विद्यार्थिनींनी शिवणकला साठी प्रवेश घेतला तर वीजतंत्रीसाठी ४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील मंगळवार,गुरुवार व शनिवार या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत दिले गेले असून तीन महिने कालावधीचा परिपूर्ण कोर्स होता. या प्रशिक्षणासाठी,सतीश सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई) संस्थेचे सर्वे पदाधिकारी तसेच शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत, शालेय समितीचे सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षणासाठी शिवणकला कोर्स मार्गदर्शक साक्षी संतोष दळवी तर वीजतंत्री कोर्स साठी संदीप वासुदेव पेडणेकर तसेच विभाग प्रमुख म्हणून माध्यमिक विभागातील एस.एम. न्हिवेकर मॅडम (सहा. शिक्षिका) व उच्च माध्यमिक विभागातील एच. बी. पटेल (सहा. शिक्षिका) यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!