जिल्हास्तरीय जागतिक महिला मॅरेथॉन स्पर्धेचे 10 मार्च राेजी आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम, सिंधुदुर्ग व कणकवली तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग आयोजित जागतिक महिला दिना निमित्त पहिली महिला सिंधुदुर्ग जिल्हा मॅरेथॉन स्पर्धा रविवार 10 मार्च रोजी सकाळी 7 वाजता कणकवली तालुक्यात खारेपाटण किवा कणकवली येथे घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे गट 12 वर्षा खालील मुली -2km,14 वर्षा खालील मुली -3km,16 वर्षा खालील मुली -4km, 18 वर्षा खालील मुली -4km, महिला खुला गट -6km,45+ महिला गट -2km धावणे असे गटा मध्ये स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धा शुल्क रु.300/- प्रती खेळाडू आकारण्यात येतील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच प्रथम तीन क्रमांकना मेडल्स किव्हा ट्रॉफी व प्रविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल.या मॅरेथॉनला ब्रँड आंबेसेंडर कु आरती देशमुख व अनेक स्पर्धक धावणार आहेत.स्पर्धा नाव नोंदणीकरिता अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2024 राहील. तरी जिल्ह्यातील सर्व शालेय,महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

error: Content is protected !!