अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीला एलसीबी चा दणका

3 लाख 88 हजारांच्या दारुसह 8 लाख 38 हजार 800 चा मुद्देमाल जप्त

ओरोस (प्रतिनिधी) : गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने अवैध गोवा बनावटीच्या 3 लाख 88 हजार 800 रुपयांच्या दारुसह 4 लाख 50 हजारांची हुंडाई आय टेन कार असा एकूण 8 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने हुमरमळा येथे 8 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी पकडला. या गुन्ह्यात ओंकार इंद्रजित सावंत ( वय 26, रा.डिगस गोरवलीवाडी, ता कुडाळ ) याला अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोउपनि. कोयंडे, पोह, देसाई, पोह डिसोजा, पोकॉ नार्वेकर, पोकॉ आरमारकर यांनी ही कारवाई केली. आरोपी ओंकार सावंत हा गोव्याहून रत्नागिरी च्या दिशेने अवैध दारू वाहतूक करणार असल्याची माहिती एलसीबी ला मिळाली होती.त्यानंतर पीआय अतुल जाधव यांनी आपल्या पथकासह सापळा रचला होता. संशयित कार दिसताच थांबवून पाहणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली.

error: Content is protected !!