आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून शिरवल मुख्य रस्त्याला पावणेचार कोटींचा निधी

माजी सरपंच महेश शिरवलकर यांनी मानले आमदार नितेश राणेंचे आभार

कणकवली (प्रतिनिधी) : शिरवल गावातील मुख्य रस्त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल पावणेचार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिरवल माजी सरपंच महेश शिरवलकर यांनी आमदार नितेश राणेंची सदिच्छा भेट घेत आभार मानले. यावेळी सुशील तांबे, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. शिरवल गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक तसेच ग्रामस्थांना त्रास होत आहे. याबाबत माजी सरपंच महेश शिरवलकर यांनी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता या रस्त्यासाठी सीएमजीएसवाय योजनेतून पावणे चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणीही शिरवलकर यांनी केली. तसेच शिरवल गावात येणारी रात्री 8 वाजताची एसटी फेरीही सध्या बंद आहे. सदर एसटी फेरी सुरू करावी अशी मागणीही शिरवलकर यांनी आमदार नितेश राणेंकडे केली. विभागीय अधिकाऱ्यांना सांगून सदर एसटी फेरी सुरू करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.

error: Content is protected !!