रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सविताश्रम पणदूर (अनाथालय ) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी शहरात आज स्वच्छता मोहीम

शहर स्वच्छता मोहीमेचे पोलीस निरीक्षक यांच्या कडून कौतुक

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सविताश्रम पणदूर (अनाथालय) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी शहरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली कामत व १८ अनाथ पुरुष महिलांनी सहभाग घेतला. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सविताश्रम पणदूर यांच्या या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक वैभववाडी यांनी भरभरून कौतुक केले. अनाथाश्रमातून आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी रोटरी क्लब बरोबर नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्रशांत गुळेकर, चार्टर्ड प्रेसिडेंट संतोष टक्के, विध्याधार सावंत,मनोज सावंत, मंगेश कदम, श्रेया धावले,स्नेहल रावराणे, संजना रावराणे उपस्थित होते. दत्तमंदिर ते संभाजी चौक परिसरात या वेळी स्वछता मोहीम राबविणेत आली.

error: Content is protected !!