कलमठ नाडकर्णीनगर येथील गणपती मंदिरात गणेश जयंती व सत्यनाराण महापुजा

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ नाडकर्णीनगर येथील गणपती मंदिरात मंगळवार 13 राेजी श्री गणेश जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापुजा आयाेजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम हाेणार आहेत.

सकाळी 6 वाजता श्रींची पुजा व अभिषेक, सकाळी 8 ते 10 श्री गणपती पालखीची मिरवणुक,सकाळी 10 ते 12 श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी 12 ते रात्री 8 वा. वैयक्तिक एकादशमी व नवस बाेलणे, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 6 भजन, सायंकाळी 7 वा.नगरातील मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, रात्री 11 वा.श्रींची पालखी प्रदक्षिणा व आरती आदी कार्यक्रम हाेणार आहेत.

श्री गणेश जयंती उत्सव व सत्यरायण महापुजेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाडकर्णी नगर व श्री स्वामी समर्थ नगर गणपती मंदिर उत्सव कमिटीच्यावतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!