वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम जिल्हा सिंधुदुर्ग या क्रीडा संस्थे च्या खेळाडूंनी दि बॉम्बे केरला समाजम, माटुंगा, मुंबई या संस्थेनी दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय १० कि.मी. चालणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धे मध्ये विजयी खेळाडू १५ वर्षा खालील मुलींच्या गटात नेत्रा निलेश राऊत (दुसरा क्रमांक ), आर्या सतीश सावंत (उत्कृष्ठ चालणे पदक ), व महिला खुला गटाची वैभववाडी ची तांबळघाटी एक्सप्रेस हर्षदा बोडेकर (तृतीय क्रमांक ),तसेच सहभागी खेळाडू प्राची तणावडे, कार्तिकी श. जाधव, श्रुष्टि श. जाधव, ओम विनोद उन्हाळकर यांनी मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व कणकवली तालुक्याचे नाव लौकिक केले तसेच त्यांचे मार्गदर्शक समीर जयवंत राऊत (अध्यक्ष/ राज्य क्रीडा मार्गदर्शक ), अंजली जयसिंग गायकवाड ( महिला अथलेटिक्स प्रमुख ), सुवर्णा अभिजित जोशी (सचिव ),जयश्री सतीश सावंत (पालक ),अमृता निलेश राऊत (पालक ),सुनिल संवणे (अथलेटिक्स प्रमुख प्रशिक्षक, श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ) तसेच निरोम गावातील ग्रामस्थनी, निरोम ग्रामस्थ मंडळ, निरोम – मुंबई नी त्यांचे अभिनंदन केले.













