खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

शेतकऱ्यांनी दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०१७ च्या यादितील तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवी या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लक्ष वेधले .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातिक व आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही यासाठी त्यांनी आज सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले तर याबाबत न्याय न मिळाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .

सन २०१७ च्या यादीतील ३०७७ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अनेकवेळा आंदोलने केली उपोषण केले तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही . आता शेतकऱ्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे २ लाख वरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दया . तसेच सक्तीची कर्ज वसूली तात्काळ थांबवावी . अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी आग्नेय फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर ,प्रकाश वारंग, सुरेश गावकर, महेश चव्हाण,सुधीर परब, लाडू परब, श्यामसुंदर राय आदीं शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!