माजी आम. जिजी उपरकर यांचे उद्या कणकवलीत ठिय्या आंदोलन

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या कारभाराविरोधात जिजी आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारभाराविरोधात माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर हे आक्रमक झाले असून उद्या 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. अधीक्षक अभियंता जोवर सर्वगोड यांच्या कारभाराबद्दल आंदोलनस्थळी येऊन चर्चा करत नाहीत तोवर ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही उपरकर म्हणाले आहेत. कार्यकारी अभियंता सर्वगोड हे मनमानी कारभार करत असून भ्रष्टाचार करत असल्याचा वारंवार आरोप उपरकर यांनी याआधीही केला आहे. 15 फेब्रुवारी रोजी सर्वगोड यांच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा याआधीच उपरकर यांनी दिला होता.त्यानुसार उद्या उपरकर ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात उपरकर यांच्यासोबत विनोद सांडव, प्रसाद गावडे, आशिष सुभेदार, राजेश टंगसाळी, आप्पा मांजरेकर, मंदार नाईक, दीपक गावडे, बाबल गावडे आदींसह जिजी उपरकर समर्थक आंदोलनात सहभागी असणार आहेत.

error: Content is protected !!