आंबोली घाटात खोल दरीत कोसळला ट्रक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली येथील घाटात आयशर वाहतूक करणाऱ्या ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला बाहेर काढला. त्याला अधिक उपचारासाठी येथील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!