सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आ. वैभव नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करतो. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ येत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. मी पालकमंत्र्यांना नियोजित दौ-यामध्ये शासकीय विश्रामगृहावर विकासकामांसदर्भात अधिका-यांसमोरच भेटलो. नितेश राणेंच्या मतदारसंघातील त्यांच्या डोळ्या समोरील असलेल्या शासकीय विश्रागृहात भेटलो आहे. माझ्या निष्ठेवर नितेश राणेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. जे गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी नितेश राणे अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका भाजपा आ. नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रतिउत्तर शिवसेना आ. वैभव नाईक यांनी दिले.

गेले १५ वर्ष मी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतोय. आणि ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी कुठलीही सत्ता शिवसेनेबरोबर नव्हती. आज दोन वेळा मी आमदार झालोय आणि लोकांनी माझ्या निष्ठेवर विश्वास ठेवल्यामुळेच मी आमदार झालोय. याची मला पुर्ण जाणीव आहे. आणि येणा-या काळामध्ये सुध्दा उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबतच मी राहणार आहे. आणि हे मला वारंवार नितेश राणेंसारखी सांगण्याची काही गरज नाही. कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष बदलत असतात. त्यांनी स्वतः एक पहिली निवडणूक त्यांनी कॉग्रेसच्या चिन्हावर लढवली. दुसरी त्यांच्या स्वाभिमानच्या चिन्हावर त्यांच्या भावाने लढवली. आणि दुसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवली. आणि त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबिय असतात, अशी टिका आ. वैभव नाईक यांनी केली.

error: Content is protected !!