मसुरे (प्रतिनिधी) : जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने १ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवासस्थान येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर आणि पेडणेकर बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.













