संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात आचरा प्रभागात चिंदर ग्रामपंचायत प्रथम..!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

आपला जिल्हा स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक आपण कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया-पालकमंत्री रवींद्र चव्हाण

आचरा (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन 2020-21 आणि सन 2021-22 या वर्षीचा आचरा जिल्हा परिषद प्रभागात चिंदर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. नुकतेच सिंधुदुर्ग नगरी येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिंदर सरपंच नम्रता महंकाळ-पालकर, ग्रामविस्तार अधीकारी मंगेश साळस्कर व ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल माजी सरपंच, विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधीकारी, कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी आमदार राजन तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विनायक ठाकूर, सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, विद्यार्थी आदी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!