वन अधिकाऱ्याला २० हजारांचा दंड का ठोठावू नये ? पुणे आयुक्तांकडून शो कॉज नोटीस

सावंतवाडी (प्रतिनिधी) : माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळा केल्या प्रकरणी कोल्हापुर मुख्य वनसंरक्षककार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना २० हजाराचा दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिली होती. त्यांच्या आडवली येथील सॉ मिलला २००७ मध्ये चुकीच्या पध्दतीने दंड ठोठावण्यात आला होता. याबाबत श्री.बरेगार यांनी कोल्हापुर मुख्य वनसंरक्षक कार्यालयात माहिती मागितली होती. त्या ठिकाणी दिलेल्या मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पुणे येथे आयुक्त कार्यालयाकडे अपिल केले होते. त्यांनी ही संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असा दावा श्री. बरेगार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आला आहे.

error: Content is protected !!