अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, साहित्यसूर्य वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा, गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय चिंदर येथे काल संस्था अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मराठी राजभाषा, गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संतोष पाताडे, सहसचिव सिद्धेश गोलतकर, हिमाली अमरे, प्रकाश खोत, गोपाळ चिंदरकर, रणजित दत्तदास, ग्रंथपाल नम्रता महंकाळ-पालकर, कवी भूषण दत्तदास शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.













