वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आंब्याच्या झाडावर औषध फवारणी करत असताना अचानक झाडाची फांदी तुटल्याने खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी कुबलवाडा येथे घडली. शेखर महादेव नाईक (वय ४९) रा. वेंगुर्ले- परबवाडी असे संबंधित कामगाराचे नाव आहे. यागबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.