पदसिद्ध अध्यक्षपदी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची निवड
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची निवड झाली आहे. नुतन संचालक म्हणून सर्वश्री कमलाकांत धर्माजी कुबल, संजय महादेव गवस, मधुकर मोहन देसाई, कमलेश विलास गावडे, विद्याप्रसाद दयानंद बांदेकर, नंदकिशोर बळीराम सावंत, समाधान तुकाराम जाधव, सदानंद विष्णू जेठे,नूतन नुकुल मांजरेकर, सुभाष चंद्रकांत बोवलेकर,अंबाजी भागू हुंबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव कार्यालय अधिक्षक, जिल्हा निबंधक यांनी काम पाहिले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा दि. १ मार्च २०२४ रोजी संपन्न झाली.या सभेत नूतन सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील विकास संस्थांचे काम गतिशील होण्यासाठी पूर्वीप्रमाणे जिल्हा देखरेख संस्थेमार्फत सचिव उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम १९६० चे कलम ६९ मध्ये सुधारणा करुन पूर्वीप्रमाणे सचिव नेमणूकीकरीता शासनाने मान्यता द्यावी यासाठी सिंधुदुर्ग व इतर सहकारी बँकांनी राज्य शासनाकडे सातत्याने मागणी केली होती. सदर मागणीचा विचार करुन शासनाने दिनांक २९ फेब्रुवारी २०२० च्या राजपत्रात सदरच्या सुधारणा केल्या असून यासाठी शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले या निर्णयामुळे जिल्हयातील सर्व विकास संस्थांना जिल्हा केडर मार्फत सचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे याबद्दल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आभार व्यक्त केले आहेत.