ए.के.स्पोर्ट्स वरवडे च्या वतीने ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिक्रेट स्पर्धा

एक गाव एक संघ धर्तीवर साखळी पद्धतीने खेळवले जाणार सामने

लाखो रुपयांची बक्षिसे ..6 मार्च ते 10 मार्च दरम्यान वरवडेत रंगणार क्रिक्रेट संग्राम

कणकवली (प्रतिनिधी) : ए.के. स्पोर्ट्स च्या वतीने ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिक्रेट स्पर्धेचे 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून एक गाव एक संघ या धर्तीवर केवळ 16 संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. वरवडे सुतारवाडी येथील मैदानावर क्रिकेटस्पर्धा संपन्न होणार असून सिंधुदुर्ग सह राज्यातील दिग्गज क्रिक्रेटपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लाखो रुपये बक्षिसांची रक्कम असणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख 51 हजार आणि आकर्षक चषक दिला जाणार आहे. द्वितीय विजेत्या संघाला रोख रु. 25 हजार आणि आकर्षक चषक तसेच मालिकावीर, अंतिम सामनावीर सर्व सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज क्षेत्ररक्षक तसेच अन्य पारितोषिक देऊन खेळाडूंना रोख बक्षिसासह आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली  जाणार असून प्रवेश फी 5 हजार रुपये आहे. त्यातील 2 हजार Gpay करणे बंधनकारक आहे. Gpay केल्यानंतरच स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला जाणार आहे. Gpay नंबर सागर राणे 9405740474 आहे. संघ नोंदणीसाठी ऍड. अभिजित सावंत मोबा. 8828287171 / मंदार मेस्त्री मोबा. 7083826496 / सागर गावडे मोबा. 8806726915 / निलेश कदम मोबा. 7410143107 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!