आंबोलीतील ” त्या ” बंगल्यांवर हातोडा

तहसीलदार श्रीधर पाटील यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश

आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली हिरण्यकेशी येथे उभारण्यात आलेले १९ बेकायदेशीर बंगले येत्या ४८ तासांच्या आत पाडून शासनाची जागा मोकळी करून द्यावी अशा प्रकारचे आदेश सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले काढले असून संबंधितांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आज उपोषणकर्त्यांची शिक्षण व मराठा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन संबंधित बांधकामावर शासन योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन देत बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना न्यायालयात जाऊन त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी यावेळी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, यावेळी तहसीलदार यांनी शासनाची बाजू आम्ही भक्कमपणे तयार केली आहे असे सांगून जी बेकायदा बांधकामे आहेत ती पाडली जातील असे आश्वासन दिले. जोपर्यंत बेकायदेशीर बांधकामे पाडली जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सुरूच ठेवणार आहोत असे उपोषणकर्त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सांगितले.

error: Content is protected !!