ग्रामपंचायतच्या वतीने उद्योजक , पत्रकार , ग्रामसेवक , शिक्षक , वकील , आरोग्य कर्मचारी , वायरमन , सफाई कामगार , यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्वांचा सत्कार
चौके (अमोल गोसावी) : धामापूर सरपंच सौ. मानसी महेश परब यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी धामापूर ग्रामपंचायत सभागृहात गावच्या सर्वांगीण जडण घडणीत हातभार लावणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्वांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. तसेच धामापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला तर धामापूर गावचे सुपुत्र श्री सुनिल दत्ताराम चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे , कृषि अधिकारी संजय गोसावी , सामाजिक कार्यकर्ते महेश धामापूरकर , सरपंच सौ. मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर , माजी सभापती राजेंद्र परब , ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , तेजस्विनी धामापूरकर , स्वप्निल नाईक , साक्षी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने गावच्या जडण घडणीत हातभार लावणारे उद्योगपती महेश परब , कृषी कॉलेज प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते महेश धामापूरकर , अविनाश निकम , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिपक गोसावी , धामापूर खालचावाडा शाळेचे मुख्याध्यापक महेश जिकमडे , उपशिक्षीका सुकन्या गंगावणे , रेश्मा गोसावी वीज वितरण कर्मचारी सागर गावठे , योगेश काळसेकर , वकील ॲड. सतिश धामापूरकर , ॲड. कन्हैया निवतकर , समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे , आरोग्य सेविका गौरी कसालकर , पोस्ट मास्टर संजय मर्तल , पोस्टमन मधुसूदन काळसेकर , तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप चव्हाण , बस थांब्यावर बसण्याचे बेंच दिल्याबद्दल शशिकांत गावडे , विनय मराठे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम , विनामोबदला रस्ता दिल्याबद्दल श्री भिवा चुडनाईक , लॅपटॉप प्रिंटर दिल्याबद्दल श्रीम. स्मिता कोरगांवकर , श्रीम डॉ. अर्चना जेठे , कृषि साहाय्यक नेहा चौखंडे , ग्रामपंचायत कर्मचारी सुशीलकुमार घाडी , लिपिक गणेश फोपळे , पाणी पुरवठा कर्मचारी संतोष मराठे , डाटा ऑपरेटर सिद्धी परब , आरोग्यसेवक गणेश जाधव , सफाई कर्मचारी रेवती धामापूरकर आणि पत्रकार अमोल गोसावी यांच्यासह गावातील इतर महत्वाच्या व्यक्तीमत्वांचा सन्मानचिन्ह देउन सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी सभापती राजेंद्र परब यांनी गावाच्या जडण घडणीत हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सत्कार करून त्यांच्या मध्ये उमेद निर्माण करणे ही सरपंच सौ मानसी परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांची संकल्पना कौतुकास्पद असून इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर उपसरपंच रमेश निवतकर यांनी बोलताना सांगितले कि , गावच्या सर्वांगीण विकासास हातभार लावणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो . आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळेच आम्हाला गावची विकासात्मक जडणघडण करणे सोपे जाते. तसेच गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी सरपंच मानसी परब यांच्या कार्याचे कौतुक करून सेवानिवृत्त ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक दिपक गोसावी यांनी केले तर आभार उपसरपंच रमेश निवतकर यांनी मानले.
















