खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक तथा खारेपाटण जिल्हा परिषद शिवसेना संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त दी.५ व ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथे भव्य अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांक विजेता संघाला रोख रक्कम- १११११/- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता संघाला ७७७७/- रुपये
व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज व शेत्ररशक याना आकर्षक चषक देन्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेची प्रवेश फी ७०० /- रुपये ठेवण्यात आली असून ज्या संघाना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे.त्यांनी आपली नावे
प्रवीण गुरव – ९३५६३२९५०५ व निखिल गुरव – ९८३३३७७०१५ यांचेकडे नोंदवावित असे आवाहन शिवसेना पक्ष खारेपाटणच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता खालील नियम ठेवण्यात आले आहेत.
१)पांचाचा निर्णय अंतिम.राहील.
२)प्रत्येक संघात ७ खेळाडू असतील
३)प्रत्येक सामना ४ षटकांचा राहील
४)संघाची वर्तणूक बघून री- एन्ट्री दिली जाईल.
५) सामन्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक
६) सर्व अधिकार मंडळाकडे राखीव राहतील












