स्व.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी दुग्ध व्यवसाय प्रात्यक्षिका तून समृद्धी च्या मार्गावर

कृषिपुरक दूध व्यवसायातून शेतकऱ्यासाठी चांगले दिवस !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषी पदवी मध्ये शेवटच्या सत्रात कृषिविद्यापीठाने अनुभावतमक शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात केली. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोठ्या पगाराच्या शासकीय किंवा खासगी नोकऱ्यांमागे न लागता कमी भांडवलामध्ये आपला कृषीपुरक व्यवसाय सुरू करावा. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा आहे.

सध्या भारतीय शेती ही निविष्ठांवर अतिरिक्त खर्च व कमी उत्पादन अशा दुहेरी संकटात सापडलेली आहे.
भारतीय शेतीची ही अवस्था सध्याच्या कृषी हवामानातील बदलांमुळे झाल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त कृषी पिकांवर अवलंबून न राहता त्याला एखाद्या कृषिपुरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.मागील काही वर्षात होणाऱ्या हवामान बदलांमध्ये दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याचे दिसून आले आहे. दूध विकण्याबरोबरच अतिरिक्त दुधाचे दुग्धपदार्थ बनवून विकल्यास चांगल्या पद्धतीने नफा कमावला जाऊ शकतो हे निदर्शनास आले आहे.सदर कार्यक्रमाअंतर्गत दूध व दुग्ध पदार्थ प्रक्रिया या विषयामध्ये कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशस्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लस्सी, ताक, पनीर, बासुंदी, रबडी, खवा, गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला असे विविध पदार्थ बनवून त्यांची स्थानिक फोंडा बाजारपेठेत विक्री केली आहे.

सदर कार्यक्रमात विशाल शिंदे,साहिल सावंत,तेजस तिकुटे,तृषाल तिकुटे,नयन वळवी, नितीन वंजारा, यांनम रॉय,सिद्धेश जोशी, अजिंक्य रवांडे, गौरव वरुटे, महेश साळुंखे, अनुदान वळकुंडे, ओमकार येडवे, अनिरुद्ध शिर्के, ऐश्वर्या ठाकूर, प्रमिता रायपुरे, श्रीजा रेड्डी, साक्षी सातवसे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्याना ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिपेश मराठे व संचालिका विद्या राणे-पाटील मॅडम यांचे सहकार्य तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. डी. बी.कदम मॅडम, कार्यक्रम अधिकारी पी.एस.शिर्के, कार्यक्रम समन्वयक के.आर.भोकरे, एस. एस .मोटे, कु.भाग्यश्री साटम यांचे मार्गदर्शन लाभले आहे

error: Content is protected !!