प्रमोद जठार म्हणजे राणेशाही चे मांडलिकत्व घेतलेले रणछोड दास

शिवसेना ठाकरे गटाचे संदीप सरवणकर यांची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटा चे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांना खलनायक बोलले होते, त्यांना प्रतिउत्तर देताना माध्यमांना सांगितले की, “भाजपाचे हे रणछोड दास व आर्थिक मांडवलीसाठी, राणेशाही चे मांडलिकत्व स्वीकारणारे हिट विकेट झालेले माजी आमदार , आता ज्यांनी भल्या भल्या राजकीय रावणा ना केले ठार , त्या विनायक रावाना आडवे करण्याचे स्वप्न पाहत आहेत.खरतर, आता पर्यंत भाजपा ची कूटनीती ही जनतेच्या लक्षात आली आहे. स्वतःला विकणारे हे, लोकांच्या विकासाच्या नावाखाली देश विकायला कमी करणार नाहीत,.हे दिसू लागले म्हणून कोकणात नासके प्रकल्प ना जनतेतूनच विरोध झाला होता आणि त्यामुळे यांचे आर्थिक मनसुबे ढासळले गेलेले आहेत. हे त्यांचे वैफल्याचे खरे कारण आहे, त्यातून हे जठार राव हे विनायक राऊत साहेब बद्दल आता राणे डिक्शनरी चे शब्दप्रयोग करिता असताना दिसत आहेत. आपले सर्वस्व स्वाभिमानाला “घान “ठेवलं नंतर हे ,असे ” घाण घाण” बोलू लागले आहेत. परंतु मालक तसा पोपट बोलणार याच वावग जनतेला मुळीच वाटणार नाही.हे नक्कीच, त्यामुळे विनायकराव हे यांनी घेतलेल्या “तुरे ” वाल्यांचे “सुपारी” पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील . हा कोकणचा कौल आहे.

error: Content is protected !!