लग्न प्रसंगी नववधू अथवा कुटुंबियांना मिळणार ‘लाख’ मोलाची साथ
तळेरे (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटुंब तर देशातील जनता हे दुसरे कुटुंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती होतात, तेेव्हा ते आपल्या कुटुंबा पेक्षा देशसेवेला अधिक प्राधान्य देत आपले सर्वस्व अर्पण करतात. आपल्या देशाचे रक्षण करताना जेव्हा हेच जवान शहीद होतात अथवा गंभीर जखमी होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात होतो. सरकार आपल्या परीने अशा कुटुंबांच्या पाठीशी उभी राहते. परंतु सरकारच्या काही मर्यादा आहे. त्यामुळे शहीद व गंभीर जायबंदी झालेल्या कुटुंबांची स्वप्ने त्यांच्या कुटुंबाचे घटक समजुन पुर्ण करण्याचा संकल्प ‘विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशन’ने (विडीसीएफ) केला आहे. ही स्वप्ने पुर्ण करण्यासाठी ट्रस्टकडून ‘लाख’ मोलाची साथ मिळणार आहे. ट्रस्टला प्रतिक्षा आहे अशा कुटुंबांच्या माहितीची.
सैन्यदलातील जवानांबरोबर लग्नगाठ बांधताना नवविवाहीता अनेक स्वप्न उराशी बाळगुन असते. लग्नाला काही दिवस होत नाही तोच जवानाला सिमेवर देश रक्षणासाठी कर्तव्यावर हजर रहावे लागते. गेल्या काही वर्षांमध्ये सिमेवरील घुसखोरी, अतिरेकी हल्ले यांचा सामना करताना अनेक तरुण जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शहीद झालेल्या अशा सैनिकांची आपल्या कुटुंबाप्रतीची स्वप्ने अपुर्ण राहतात. मग आई-वडीलांची सेवा, पत्नी व मुलांप्रती कर्तव्य असो, ही शहिदांची स्वप्ने काही अंशी का असेना पुर्ण करण्याचा VDCF चा संकल्प आहे. स्वरमानस या संस्थेतर्फे नुकताच शिवाजी पार्क येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला ‘लाख’ मोलाचा निधी मानसी केळकर ह्यानी विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशनकडे सुपूर्त केला. या निधी द्वारे अशा कुटुंबियांची एखादी ईच्छा पुर्ण करुन आनंद देण्याचा VDCF चा प्रयत्न आहे.
योग्य विनियोग व्हावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचे नमुने व माहिती दि. १३ फेब्रुवारी च्या पत्राद्वारे मेल केली असून १५ मार्च अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. office@dalvie-foundarion.org ह्या इमेल आयडीवर आपला अर्ज विहित नमुन्यात पोहोचणे अपेक्षित आहे. तेही शक्य न झाल्यास कुटुंबाचे ९८२०७५७२७४ ह्या नंबर वर WhatsApp मेसेज द्वारे शंका निरसन केले जाईल असे विडीसीएफचे अध्यक्ष विनायक दळवी यांनी कळविले आहे.