शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुस्तक दालनाचे झाले उदघाटन
खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोभुर्ले – मालपे येथील विस्तार प्रकल्पाच्या योजने अंतर्गत ॲग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालणाचे श्रीफळ वाढवून आणि फित कापून ना. दिपक भाई केसरकर यांच्या हस्ते उद्घाटण झाले. पर्यटना बरोबर पोभुर्ले मालपे गावांच्या विकास व्हावा वाचन चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात यावे येथील लोकांचे जीवनमान उचावू शकले पुस्तकाचे गाव या योजनेतील लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास प्रचार आणि सस्कृतीची जोपासना व्हावी भाषेची आवड वाढवावी. भारतातील दुसरे आणि कोकणातील हे पहिले ग्रंथदालन आहे असे प्रतिपादन ना दिपक भाई केसरकर मत्री मराठी भाषा शालेय शिक्षण यांनी प्रसाद मालपे कर यांच्या कासा अल्फान्सो सभाग्रहात केले.
यावेळी व्यास पाठीवर माणुसकी फांडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर . डॉ शामकांत देवरे संचालक राज्य मराठी विकास संख्या रेखा दिघे पुस्तक निवड समिती देवगड तहसिलदार जनार्दन साहीले श्रीकृष्ण ठाकूर उमेश तोरस्कर गावकर आदी मान्यवर उपस्थित होत . केसरकर पुढे म्हणाले पुढील काळात वेरूळ नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचे गाव उभारण्या बाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल . हे ऑन वे या वेल्स ( इंग्लड ) मधील पुस्तकाच्या गावाच्या धरतीवर ही योजना संकल्पना सर्वप्रथम ना .विनोद तावडे यांनी राबविली असल्याचे सांगून आद्य पत्रकार बाळशास्त्री जाभेकर विदा करंदीकर यांच्या जन्म गावी असल्याने यांचा उपयोग सर्वाना होणार आहे असे दालन महाराष्ट्रात कोठेही नाही येथील कॉपी अप्रतिक असल्याचा आपल्या भाषणात उलेख केला यांचा मला साथ अभिमान वाटतो. जगातील मराठी भाषिकांसाठी मराठी भाषा परिषद करीत आहेत असे म्हणाले . कार्यक्रमांचे सुत्र संचालन व आभार आप्पा बेलवलकर यांनी मानले.













