वैष्णवी हावळ, चंदना गुरव व साक्षी भोसले यांनी पटकावला प्रथम क्रमांक
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व सकल मराठा समाज वैभववाडी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : सकल मराठा परिवार तालुका वैभववाडी यांच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२४ शिवजयंती उत्सवानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इ.५ वी ते ७ वी गट पहिला, इ.८ वी ते १० वी गट दुसरा व इ.११ वी व १२ वी महाविद्यालय गट तिसरा अशा तिन गटात सदरची स्पर्धा शनिवार दि.१७-०२-२४ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी. येथे संपन्न झाली. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गट एक प्राथमिक मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी गणेश हावळ द्वितीय क्रमांक पार्थ पंडित पवार तर तृतीय क्रमांक सार्थक रामदास पवार यांनी पटकावला,गट क्रमांक दोन माध्यमिक मध्ये प्रथम क्रमांक चंदना परशुराम गुरव, द्वितीय क्रमांक शिवाणी रत्नाकर फुटक, तृतीय क्रमांक रिद्धी निलेश शिंदे यांनी पटकावला तर तिसऱ्या महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक साक्षी प्रवीण भोसले, द्वितीय क्रमांक सिद्धी गजानन पाटील तर तृतीय क्रमांक लीना नारायण मांजरेकर हिने पटकावला आहे.
या स्पर्धेचे परीक्षण प्राथमिक गट प्रा.एन.व्ही.प्रभु, माध्यमिक गट प्रा.वाय.जी.चव्हाण व महाविद्यालयीन गट प्रा.व्हि.एस.मरळकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी.एम.पाटील, एस. बी. शिंदे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, सकल मराठा तालुका समन्वयक महेश कदम ,सकल मराठा वैभववाडी तालुका सदस्य सचिन तावडे , तेजस साळुंखे, रुपेश वारंग, राजेश. पडवळ, समाधान जाधव , नितीन रावराणे तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.