अखेर शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश

नेरूर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे सह ग्रामस्थ यांच्या मागण्या अखेर औद्योगिक विकास महामंडळाकडून मान्य

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी उद्योगमंत्री उदयजी सामंत, शिवसेना नेते सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेरूर येथील वाघचौडी येथील शाम गावडे सह ग्रामस्थ दि.२६ जानेवारी २०२४ रोजी उपोषणास बसले होते. ही बाब शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांना समजताच तातडीने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न समजून घेऊन उद्योगमंत्री उदयजी सामंत, सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे सह ग्रामस्थ यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली व त्याचा प्रत्यक्ष पाठपुरावा देखील केला. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांचा दि.०८ मार्च २०२४ रोजीचा नियोजित दौरा या दौऱ्यात प्रत्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात भेट घडवून आणून त्यांचा लागलीच दोन दिवसात त्यांचा स्मशानभूमी भूखंड क्र. ओएस-९ मधून जोडरस्ता व भूखंड क्र.ओएस-२४ मधील ३ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी देऊन हे दोन्ही प्रश्न निकाली काढण्यात आले. हीच जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या कामाची पोच पावती आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचे औद्योगिक विकास महामंडळ प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे, सुरेश गावडे, जयराम परब, बाळकृष्ण गावडे, अजित मार्गी, विजय गावकर, उमाकांत तांबे, जगन्नाथ गावडे, प्रसाद पोईपकर, मंगेश राऊत, शिल्पा गावडे, निकिता गावडे, तुषार गावडे, चिन्मय राणे, महादेव मार्गी, प्रभाकर गावडे, विजय धुरी, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख राजन नाईक, समद मुजावर, राजेश सडवेलकर, लक्ष्मण महाजन, शंकर गावडे, महेश राणे यांनी आभार व्यक्त केले तसेच येत्या दौऱ्यात शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांचा प्रकल्पग्रस्त शेतकरी जाहीर सत्कार करणार आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने दिली.

error: Content is protected !!