जिल्हाधिकारी कार्यालयाला येणार नवीन झळाळी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी 23 कोटी 78 लाखांचा निधी मंजूर

कॉर्पोरेट ऑफिस सारखा चढवणार साज – कार्यकारी अभियंता सर्वगोड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय इमारत दुरुस्ती साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 23 कोटी 78 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कलेक्टर ऑफिस ची इमारत कात टाकणार असून कलेक्टर ऑफिसला नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या निगराणी खाली कलेक्टर ऑफिस ची दुरुस्ती होणार आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित कॉर्पोरेट लूक असणारी सुसज्ज आणि अत्याधुनिक अशी कलेक्टर ऑफिस ची इमारत नूतनीकरण केल्यानंतर दिसून येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी सांगितले. कलेक्टर ऑफिस इमारत दुरुस्ती आणि नूतनीकरण चा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी पाठवला होता.या प्रस्तावाला 11 मार्च रोजी प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच नूतनीकरण च्या कामाचा शुभारंभ करून शीघ्रगतीने आणि दर्जेदार असे काम केले जाणार आहे. लवकरच कॉर्पोरेट लूक असलेले जिल्हाधिकारी कार्यालय जनतेच्या सेवेत येईल असे सर्वगोड यांनी सांगितले.

error: Content is protected !!