राज्य शासनाच्या 70 व्या विभागीय राज्य नाट्य स्पर्धेत “झम्पय” चा डंका

अक्षरसिंधु चे ” झम्पय ” प्रथम नाट्य पुरस्कारासह 7 प्रथम पुरस्कारांचे ठरलं मानकरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण विभाग आयोजित, विक्रोळी, मुंबई येथे झालेल्या 70 व्या विभागीय राज्य नाट्य स्पर्धेत अक्षरसिंधु निर्मित आणि विजय चव्हाण लिखित कोकणातील धनगर बांधवांचे जीवन गाणे गाणारे नाटक “झम्पय ” कामगार कल्याण केंद्र मालवण मार्फत दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सादर करनेत आले. या नाटकाला सांघिक प्रथम क्रमांकासह प्रथम क्रमाकांचे एकूण 7 पुरस्कार प्राप्त झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाट्यचळवळीसाठी ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. या स्पर्धेत मुंबई,ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 पेक्षा जास्त नाटके सादर झाली होती.

सह्याद्रीच्या कडेकपारितील कोकणचे मूळ निवासी धनगर बांधवांचे जीवनमान, राहणीमान, संस्कृती, चालीरिती, सण उत्सव इत्यादी चा सखोल अभ्यास करून कुडाळचे माजी गट विकास अधिकारी विजय मुकुंद चव्हाण यांनी मार्मिक पण वास्तव लिखाण करून आजच्या राजकीय, सामाजिक, कायदेव्यवस्था आणि न्यायव्यवसस्थेला धारेवर धरले आहे.हया नाटकाची यापूर्वीच समाज माध्यमे आणि प्रसारमध्यमावर खूपच चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील नाट्यसृष्टीतील व सामाजिक चळवळीतील अनेक दिग्गज या प्रयोगाला उपस्थित होते. प्रेकक्षागृह पण तुडुंब भरले होते. नाटकाला टाळ्या शिट्यानी पुरेपूर प्रतिसाद दिलाच पण मान्यवर जाणकारांनी खुप चर्चा केली. गावोगावी अनेक प्रयोगासाठी मनस्वी शुभेच्छा पण दिल्यात. अक्षरसिंधु निर्मित, विजय चव्हाण लिखित आणि सुहास वरुणकर दिग्दर्शीत यापूर्वीच्या पण गावय, शबय, भाविण या तिन्ही नाटकांना सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे अक्षरसिंधु.. विजय चव्हाण.. आणि सुहास वरुणकर समीकरण म्हणजे सिंधुदुर्ग नाट्य चळवळीतील विजयाची हमी म्हणावी लागेल.

या नाटकावर काही धनगर बांधवानी आक्षेप घेतला होता. पण राज्य नाट्य स्पर्धेतील मालवण येथील प्रयोग पाहून आपल्या समाजाबाबत वास्तव व अभिमानास्पद चित्र उभे केलेबाबत भेटून शाबासकी देऊन कौतुक पण केले. या नाटकासाठी दीपक खरात, महेंद्र जंगले, धुळू कोळापटे, उज्वला जंगले, मयुरी शिंदे या धनगर बांधवानी सहकार्य लाभले . या नाटकात खालील कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रमोद तांबे, श्रद्धा परब, सुदिन तांबे,पूजा राणे, विवेक वाळके,मयूर चव्हाण, संतोष कदम, संजय राणे, अजय पडवळ,भाग्येश कांबळे, गणपत घाणेकर, विनायक शेट्ये, संजीव शेडगे, नागेश तेली, संतोष बोडेकर, मयूर जांभवडेकर,संजय ढोलये,प्रशांत गोसावी, दत्ताराम कुळये,अविनाश सावंत, धोंडीराम सावंत.

नाटकाला मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे

नाटक… प्रथम क्रमांक… झम्पय. मालवण कामगार केंद्र
नाटक द्वितीय…बिमोड मुळासकट, वागळे इस्टेट मुंबई
नाटक तृतीय…मेला तो शेवटचा होता.. विक्रोळी
झम्पय नाटकाला अन्य वैयक्तिक प्रथम क्रमाकांचे 6 पुरस्कार मिळालेत
दिग्दर्शन.. प्रथम.. सुहास वरुणकर
पुरुष अभिनय.. प्रथम… प्रमोद तांबे
स्त्री अभिनय.. प्रथम.. श्रद्धा परब
नेपथ्य… प्रथम.. संजय राणे, धर्माजी चव्हाण, दिपीका चव्हाण
संगीत प्रथम.. विजय चव्हाण/नागेश तेली
प्रकाशयोजना.. सुहास वरुणकर /विजय चव्हाण

अक्षरसिंधु निर्मित झम्पय हे नाटक कामगार कल्याण केंद्र मालवण च्या वतीने कामगार केंद्र प्रमुख संतोष नेवरेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करनेत आले होते..नाट्यनिर्मिती साठी सौं प्राची विजय चव्हाण आणि सौं विनिता वरुणकर, ग्रामपंचायत अधिकारी,भाग्यश्री सावंत, श्रद्धा आडेलकर, गुरुनाथ गावडे यांनीही परिश्रम घेतलेत.

कोकणातील धनगर बांधवानी आणि नाट्यरासिकानी एकदा आवर्जून पहावें असे आवाहन लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरुणकर, अक्षरसिंधूचे अध्यक्ष संजय राणे,कार्याध्यक्ष प्रा हरिभाऊ भिसे,सचिव संतोष कदम, मयूर चव्हाण यांनी केलेय.

error: Content is protected !!