ओसरगाव मध्ये कार भरधाव पलटी ; प्रवासी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा ते सातारा जाणाऱ्या कारला मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव गवळीवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात कारमधील पर्यटकांना किरकोळ दुखापती झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा येथील सिंग कुटुंबीय पर्यटनासाठी गोवा येथे गेले होते. तेथून परत साताराच्या दिशेने जात असताना ओसरगाव गवळीवाडी आंबेरकर दुकानासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळी. त्यानंतर दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर जात तेथे उभे असलेले टेम्पोला धडकून पलटी झाली. अपघाताची महिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन कारमधील प्रवाशांना बाहेर काढले.

error: Content is protected !!