बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी नेस्टर घोंसालवीसचा जामीन नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पीडित युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी नेस्टर आग्नेल घोंसालवीस ( वय 29, रा. सांगवे, ता कणकवली ) याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला. सरकार च्या वतीने सरकारी अतिरिक्त अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी नेस्टर याने 5 फेब्रुवारी 2024 रोजी कणकवली येथील एका लॉजवर बळजबरी ने शारीरिक संबंध ठेवले अशी फिर्याद पीडितेने दिली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या नेस्टर याने जामीन मिलण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला हरकत घेताना सरकारी अतिरिक्त अभियोक्ता तोडकरी यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, पीडित युवती मानसिक दबावाखाली आहे, पीडित फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे, फिर्यादी पीडितेला धमकी देण्याचा किंवा मारहाण करण्याचा संभव आहे, अद्याप गुन्ह्याचा तपास सुरू असून तपासात अडथळा आणण्याची शक्यता आहे,अद्याप आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीच्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेतली. तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी चा जामीन मंजूर फेटाळण्यात आला.

error: Content is protected !!