दामू सावंत मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत 20 मार्च रोजी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेयशिक्षणमंत्री केसरकर, आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत उडणार बैलगाडा स्पर्धेचा धुरळा

कणकवली (प्रतिनिधी) : दामू सावंत मित्रमंडळ जानवली यांच्या वतीने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यत २० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता जानवली वायंगवडे, हॉटेल निलम्स कंट्रीसाईडच्यामागे होणार आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय मंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुशिल सावंत, वेदांत सोहनी, दामू सावंत, दिपक दळवी, कुशल राणे यांनी केले.

error: Content is protected !!