वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आपल्या देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रंतप्रधान करण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवण्यासाठी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यसरकारच्या, केंद्रसरकारच्या माध्यमातून तुळस गावात भरीव निधी देण्यात आला. अनेक योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. इतर संघटनात्मक वाढीकरिता विस्तृत मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले. श्रीदेव जैतीराचे दर्शन घेतले. तसेच तुळस मानकरी गावकर मंडळी यांची भेट घेतली. तसेच तुळस गावातील उद्योजक अच्युत झंट्ये यांची भेट घेऊन तुळस गावाच्या विकासाकरिता विस्तृत चर्चा केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, सुपर वारीयर्स विजय रेडकर, शक्तिकेंद्रप्रमुख संतोष शेटकर, महिला तालुकाप्रमुख सुजाता पडवळ, मा.सरपंच शंकर घारे, बुथप्रमुख विनय गोरे, बूथ अध्यक्ष बेहेरे, तुळस गाव प्रमुख रामू परब, वैभव होडावडेकर, निधी भगत, सौ.मेस्त्री, अनिल परब, मकरंद परब, दिवा परब आणि देवस्थान मानकरी आदी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.













