कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करुळ येथे घर फोडीची घटना घडली आहे. साधारणपणे सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रोख रक्कम असे मिळून दोन लाख ८१ हजार चा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ ते २ वा. च्या सुमारास घडली.
बुधवारी सकाळी ११ वा. च्या. सुमारास घर मालक हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी २ वा. च्या सुमारास ते गजर आले. तेव्हा सदरचा प्रकार उघडकीस आला. यावेळी पाहिले असता घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाटातील असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. अचानक घडलेल्या घटनेने घरमालकाला धक्का बसला. तर घरमालकाने याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. त्यामुळे या घटनेची अधिक माहिती समजू शकली नाही. मात्र या घटनेमुळे चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दिवसाढवळ्या घरफोडीच्या या घडलेल्या घटनेमुळे कणकवली तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.












