वैभववाडी गटविकास अधिकारी आर डी जंगले कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांची घटनास्थळी पाहणी
गटविकास अधिकारी जंगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना
वैभववाडी (प्रतिनिधी) : 20 मार्च 2024 रोजी सुमारे दुपारच्या वेळेस सडूरे सोनधरणे येथे भीषण आग लागण्याची घटना घडली या घटनेमध्ये आंबा काजू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करत बागेतून आग विझवण्यास यश आले. परंतु या आगीची तीव्रता एवढी भीषण होती की या आगी मध्ये पाच ते सहा बागा जळून खाक झाल्या. सुमारे 50 ते 60 लाखांच्या वरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगी मध्ये विजयसिंह विठ्ठलराव काळे,जनार्दन भैरू काळे,जयसिंह जनार्दन काळे यांच्या बागेचे नुकसान झाले आहे. अजून हि आग आजू बाजूला पसरत आहे आजून ही बागायतदारांच्या वरील संकट अजून टळलेले नाही.या घटनेत सार्वजनिक नैसर्गिक नळ पाण्याची पाईप लाईन जळून खाक झाली आहे.
यावेळी घटनास्थळी गटविकास अधिकारी आर जंगले भेट देत संबधित अधिकारी कर्मचारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच आमदार नितेश राणे यांनी संबंधित घटनेची भ्रमणध्वनी वरून माहिती घेत नुकसनग्रस्तांना दिलास दिला आहे. गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या समवेत वैभववाडी कृषी विस्तार अधिकार प्रकाश अडूळकर,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक यू व्ही मंदावाडा मंडळ कृषी अधिकारी,सी एम कदम कृषी सहाय्यक डी डी म्हासेकर,ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोनकर,सरपंच दिपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे,कोतवाल मोहन जंगम व बागायतदार उपस्थित होते.














