खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था-पुणेचा डाँ.बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास प्रकल्प आणि फर्स्टक्राय संस्था पुणे यांच्या वतीने नुकतेच ता,जि.धुळे येथील मोराणे आणि कुंडाने गावातील आदिवासी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवजीवनःमहिलांसाठी आरोग्य प्रल्पांद्वारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोराणे येथे आयोजित या आरोग्य शिबिरात मोराणे उपनगर येथील भिल्ल वस्ती व कुंडाणे विश्वासनगर (आदिवासी वस्ती) तील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग व महालँब धुळे यांचेकडून १८ ते ४० वयोगटातील १०५ महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब (बी.पी) तपासणी, रक्तगट, वजन – उंची इ.तपासण्या करण्यात आल्या. तसेच मासिक पाळीच्या तक्रारी व इतर आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या महिलांमधील ७ महिलांचे हिममोग्लोबीन ९ पेक्षाही कमी असल्याचे आढळून आहे.तर १४ महिलांमधे सरासरीपेक्षा थायराईड अधिक असल्याचे निष्पन्न झाले.हिमोग्लोबीन कमी म्हणजेच अँनिमिया (रक्तपांढरी) असलेल्या महिलांवर प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्याने आवश्यक उपचार केले जाणार आहे.
धुळे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डाँ.एम.आर.शेख यांनी आरोग्य शिबिरासाठी महिलांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिबिरात मोराणे नागरी प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधिकारी डाँ.श्रध्दा मालवे , नागरी प्रा.आरोग्य केंद्र कृष्णनगर साक्रीरोड च्या लँब टेक्निशिअन महिषा अहिरराव , जी एन एम आशिष आखाडे,सचिन पाटिल व सहकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करून तपासणी केली.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास प्रकल्पा अंतर्गत नवजीवनःमहिलांसाठी आरोग्य प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक प्रा.रचना अडसुळे यांनी कार्यक्रमासाठी संयोजन व मार्गदर्शन केले.तर कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिता पाटिल यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका केली.सोशल वर्कर योगिता पवार यांनी सूत्रसंचलन केले तर कार्यक्रम अधिकारी गणेश उफाडे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
आरोग्य शिबिर संयोजनात नवजीवन प्रकल्प समन्वयक किसन चौरे, परिचर सुनिल सोनार,अमोल गोंधाळी आशा वर्कर मीना पाटिल,कविता देवरे, विजया बोरसे, प्रतिभा ठाकरे, रूपाली सोनार आणि क्षेत्रकार्य विद्यार्थी माधुरी साळुंखे, गौरव चौहाण यांची भुमिका राहिली.












