मडूरेत तरुणाची विष पिऊन आत्महत्या

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – परबवाडी येथील अशोक रामचंद्र परब (४५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ते कास येथे दशावतार नाटक पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा घरी येऊन त्यांनी विष घेतले असावे असा अंदाज आहे. सकाळी बेशुद्ध अवस्थेत स्थानिकांनी त्याला उपचारासाठी बांबोळी येथे नेले. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

error: Content is protected !!